
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शासकीय कार्यालयात काम करणार्या महिलांची ‘मॉर्फिंग’ (चेहर्याचे विद्रूपीकरण करून सामाजिक माध्यमांवर चित्र प्रसारित करणे) केलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात येईल, तर पोलीस निरीक्षकाचे स्थानांतर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, वर्षा गायकवाड, डॉ. भरती लव्हेकर, प्रणिती शिंदे आदींनी सहभाग घेतला.
१. जिंतूर येथील शासकीय कार्यालयात काम करणार्या महिलांची ‘मॉर्फिंग’ केलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी सदस्य मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
२. या लक्षवेधीला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांची छायाचित्रे ‘मॉर्फिंग’ करणे ही गंभीर गोष्ट आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेत अन्य आरोपी असावेत. त्यानुसार अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल मिळाला असून संबंधित साहाय्यक पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात येईल, तसेच पोलीस निरीक्षकांनी योग्य प्रकारे चौकशी केली नाही; म्हणून त्यांचे स्थानांतर करण्यात येईल. सामाजिक माध्यमांवर होणारे ट्रोलिंग आणि मॉर्फिंग यांविषयी सर्वसमावेशक सदस्यांची समिती गठित करण्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात येईल.
‘विशाखा समिती’ प्राधान्याने गठित करणार !
महिलांवरील अत्याचार रोखणे आणि त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘विशाखा समिती’ गठित करणे आवश्यक आहे. अद्याप ज्या कार्यालयांनी ही कार्यवाही केलेली नसेल त्यांनी ‘विशाखा समिती’ गठित करून तसा फलक ठळकपणे लावण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील.
संपादकीय भूमिकामहिलांवर अन्याय करणाऱ्या पोलिसांना निलंबित न करता बडतर्फ करून तात्काळ कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !