संभाजीनगर येथे हानीभरपाईसाठी शेतकर्‍यांचे ‘जलसमाधी’ आंदोलन !

संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी हानीभरपाईसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी येथील जायकवाडी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन केले. जायकवाडी धरण भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसते. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची पुष्कळ हानी होते. हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. शेतकर्‍यांना प्रशासनाने कार्यवाहीविषयी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.