‘हर हर महादेव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांना नोटीस !

चित्रपटात ऐतिहासिक प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने वाद !

पुणे – ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये दाखवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्या लढाईवरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवले आहेत. त्यामुळे सरदार बांदल, सरदार पासलकर यांचे वंशज आणि विविध संघटना यांच्या वतीने चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अन् एका मनोरंजन वाहिनीचे लेखक यांना नोटीस पाठवली आहे. चित्रपटातील प्रसंगाविषयी ७ दिवसांच्या आत पुरावे द्यावेत, तसेच लेखी खुलासाही करावा, अशी मागणीही केली आहे. योग्य आणि समाधानकारक खुलासा न झाल्यास चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अन् निर्माते यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, असे अधिवक्ता  विकास शिंदे यांनी सांगितले.