अंमलबजावणी संचालनालयाच्या अन्वेषणाविषयी न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह !
मुंबई – पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने स्वत:च्या मर्जीनुसार आरोपी निवडले आहेत. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी असतांना अद्याप त्यांना अटक का करण्यात आलेली नाही ? या प्रकरणात दिवाणी खटल्यासाठी ‘पी.एम्.एल्.ए.’ का लागू केला ? असे प्रश्न उपस्थित करत ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाने संजय राऊत यांची अटक अवैध असल्याचे म्हटले.
दिवाणी खटले आर्थिक अपहार किंवा आर्थिक गुन्हे या नावाखाली आणून त्यामध्ये निर्दोष लोकांना ओढून आणि अटक करणे, हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना दिवाणी खटल्यात, तर संजय राऊत यांना काहीही कारण नसतांना अटक करण्यात आली, अशी टीपणी न्यायालयाने केली.