हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !

हिंदु तरुणींची निर्घृण हत्या करणारे अनेक ‘आफताब’ आणि ‘सूफियान’ उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. अशांना तात्काळ फासावर लटकवावे…

सोलापूर येथे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाईफेक !

एस्.टी. कामगारांचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी शाई फेकली. या वेळी घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला.

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणातील शौर्याचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये घ्यावा !

‘पोलीस मित्र’ संघटनेच्या वतीने येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, संदीप खर्डेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

एका दिवसानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा पूर्ववत् !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत आणि सोलापूर यांवर दावा सांगितला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे शिवसेना ठाकरे गटातून २५ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

सौंदत्ती यात्रेसाठी खोळंबा आकार ६० रुपयांवरून १० रुपयांवर ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन महामंडळ

नवीन दर आकारणीप्रमाणे प्रत्यक्ष चालवण्यात आलेल्या किलोमीटरसाठी ५५ रुपये बसभाडे आणि खोळंबा आकार १० रुपये द्यावा लागणार आहे. यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे.

वैराग (जिल्हा सोलापूर) येथे गोरक्षकांनी वाचवले ५० गोवंशियांचे प्राण !

कित्येकदा गोरक्षक आणि गोतस्कर यांच्यात हाणामारी अथवा चकमक होऊन गोरक्षकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही झाल्यासच या समस्या सुटतील.

(म्हणे) ‘हिंदु धर्म संकुचित आणि कर्मठ !’ – श्रीपाल सबनीस, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

‘अवघे विश्वचि माझे घर’, हा व्यापक दृष्टीकोन केवळ हिंदु धर्म देतो; पण हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या, हिंदु धर्माला संकुचित आणि कर्मठ समजणार्‍या सबनीसांना हे कळण्याची अपेक्षा काय करणार ?

अमेरिकेची लुडबुड !

अमेरिकेतील अर्थकारण हे भारतीय बुद्धीमंतांच्या अस्तित्वावर आहे, हे अमेरिकेने लक्षात घ्यावे. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या धार्मिक स्वातंत्र्याविषयी अहवाल सादर करण्याऐवजी त्याने तेथे अस्तित्वात असलेला वर्णवाद मिटवण्याकडे लक्ष द्यावे.

पुणे शहरातील ३८ किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीसाठी १४२ कोटी रुपयांचा निधी संमत !

समान पाणीपुरवठा योजना, मलनिःसारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत् वाहिनी, मोबाईल केबल यांसाठी वारंवार खोदलेले रस्ते अद्यापही ठीक झालेले नाहीत. तात्पुरत्या स्वरूपाचे डांबर टाकल्याने पहिल्या पावसाळ्यातच रस्त्यांची चाळण होऊन जाते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उशीरा का होईना घेतलेला, हा निर्णय स्तुत्यच म्हणावा लागेल.

हिंदूंच्या धार्मिक संस्था हिंदूंना कधी असा सल्ला देतात का ?

कतारमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमुळे केरळमधील ‘ऑल केरळ इय्यातुल खुत्बा समिती’ या इस्लामी संघटनेने मुसलमानांना ‘फुटबॉलचे सामने रात्री उशिरा असल्याने तुम्ही नमाज चुकवू नका’, असा सल्ला दिला आहे.