पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

सर्वत्रच्या निवृत्तीवेतन धारकांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते. या प्रक्रियेविषयीची माहिती देत आहोत.

स्त्रियांनी ‘सर्वसाधारण रंगभूषा’ (Casual Makeup) केल्याने त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘स्त्रियांनी सर्वसाधारण रंगभूषा केल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो  ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

रुग्णालयात रुग्णांना साधना शिकवणारे आणि भगवान श्रीकृष्णाचे अनुसंधान अनुभवणारे नगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. रवींद्र भोसले !

‘डॉ. भोसले हॉस्पिटल’ हे देवाने मला साधना करण्यासाठीचे माध्यम म्हणून माझ्यासाठी उभारले आहे’, असे मला वाटते. देव आपला पिता आहे. त्यानेच आपल्याला निर्माण केले आहे. त्यामुळे देवाने अनेक वेळा मला ‘जे आपल्यासाठी आवश्यक असते, तेच देव आपल्याला देत असतो’, याची प्रचीती दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

परात्पर गुरु डॉक्टरांचे मन आकाशाएवढे व्यापक, प्रेमभाव सागराएवढा खोल आहे. त्यामुळेच परात्पर गुरु डॉक्टरांना साधक-वृद्धांच्या सोयीसाठी प्रथम भारतातील प्रत्येक राज्यात आणि पुढे प्रत्येक जिल्ह्यात ‘साधक-वृद्धाश्रम’ निर्माण व्हावेत, असे वाटते.

अधिवक्त्यांनो, जीवनात येणार्‍या तणावाच्या प्रसंगांवर मात करण्यासाठी साधना करा !

अधिवक्त्यांना वकिली व्यवसाय करतांना ताण-तणावाच्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होतांना आपल्याला दिसून येतो. हा तणाव दूर करून जीवनात आनंद मिळवून देण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेला पर्याय नाही.