एका दिवसानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा पूर्ववत् !

कोल्हापूर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत आणि सोलापूर यांवर दावा सांगितला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे शिवसेना ठाकरे गटातून २५ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा बंद ठेवण्यात आली होती. बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अखेर एका दिवसानंतर दोन्ही बाजूंकडील बससेवा २६ नोव्हेंबरला दुपारी १२ च्या दरम्यान पूर्ववत् झाल्या.