हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !

यवतमाळ येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

यवतमाळ, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु तरुणींची निर्घृण हत्या करणारे अनेक ‘आफताब’ आणि ‘सूफियान’ उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. अशांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजेच ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यात यावा’, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे केली.

या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गुरुदेव सेवा मंडळ, शिवतीर्थ मित्र मंडळ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योग वेदांत सेवा समिती, भाजप, शिवसेना, भाजप महिला आघाडी, बजरंग दल, रणरागिणी शाखा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह धर्मप्रेमी, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला.

क्षणचित्रे

१. पोलिसांनी आंदोलनाचे संपूर्ण चित्रीकरण केले.

२. शालेय विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या.