(म्हणे) ‘हिंदु धर्म संकुचित आणि कर्मठ !’ – श्रीपाल सबनीस, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

श्रीपाल सबनीस

पिंपरी (पुणे) – हिंदु धर्म संकुचित आणि कर्मठ आहे. ऋषिमुनी यांनी वेदात जे सांगितले आहे, ते प्रत्यक्षात घडले नाही. पशू आणि मानव एकच असल्याचे सांगणारा धर्म माणसामाणसांत फरक करतो, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. काळेवाडी येथे मातंग ऋषि साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सबनीस बोलत होते. या प्रसंगी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, माजी मंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.

सबनीस पुढे म्हणाले की, हिंदु-बौद्ध धर्मात मातंग ऋषींचे महत्त्वाचे योगदान आहे. मातंग हा शब्द जातीवाचक नाही. रामायणातील हनुमान, तसेच वानरेही मातंग कुळातील होती. सर्व जातीय, भारतीय-जागतिक मानदंड एक करणारे अण्णा भाऊ साठे हे एकमेव आहेत.

संपादकीय भूमिका

अध्यात्म, तसेच धर्म यांचा अभ्यास नसल्यामुळे श्रीपाल सबनीस यांच्याकडून वेद आणि हिंदु धर्म यांना न्यून लेखणारे, हिंदूंची दिशाभूल करणारे वक्तव्य ! ब्रह्मांडाची रचना झाली, तेव्हापासून सनातन वैदिक हिंदु धर्म आहे. ‘अवघे विश्वचि माझे घर’, हा व्यापक दृष्टीकोन केवळ हिंदु धर्म देतो; पण हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या, हिंदु धर्माला संकुचित आणि कर्मठ समजणार्‍या सबनीसांना हे कळण्याची अपेक्षा काय करणार ?