दादर येथे हलालविरोधी बैठकीचे आयोजन !

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हलाल अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करा ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्‍या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा.

रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत !

‘रामराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे करणे, देशात शिक्षणात ‘रामायणा’चा समावेश करणे, कालगणना ‘ख्रिस्तपूर्व’ (ए.सी.) आणि ‘ख्रिस्तानंतर’ (डी.सी.) याऐवजी प्रभु श्रीरामाच्या पूर्वी अन् प्रभु श्रीरामाच्या नंतर अशी करावी, असे संकल्प करून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’’

आरोपी सचिन वाझे यांच्याकडून कारागृहात असभ्य वर्तन !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड त्याच उद्देशाने वापरला जाणार का ? याविषयी साशंकता !

बेलापूर येथील सेक्टर २३ मधील एका तारांकित हॉटेलसाठी सिडकोने दिलेला भूखंड ई-निविदा आणि ई-लिलाव पद्धतीने त्यांनी विक्रीस काढला आहे.

(म्हणे) ‘मतपेटीसाठी चाललेल्या राजकारणातून ‘मुसलमान त्रास देतात’, असा अपप्रचार केला जातो !’

‘गुरुकुल विश्वपीठा’चे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवतगुरुजी यांची मुक्ताफळे

असे चित्रपट काढाल, तर गाठ माझ्याशी ! – छत्रपती संभाजीराजे

हिंदु सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो. हिंदूंनी आतातरी जागरूक होऊन स्वतःच्या श्रद्धास्थानांचे विडंबन वैधमार्गाने रोखावे !

त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे त्रिपुरारी पौर्णिमेची १५५ वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा आजपासून चालू !     

२ वर्षांनंतर यात्रा निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असणार आहे. सद्यस्थितीत रथयात्रेची सिद्धता चालू असून ४० सहस्रांहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पुणे येथे महिलेस पोलीस ठाण्यात बोलावून पुष्कळ मारहाण करणार्‍या पोलिसावर १५ दिवसांनंतर गुन्हा नोंद !

रस्त्यामध्ये अडथळा होत असलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याचा राग धरून पोलीस कर्मचारी राहुल शिंगे यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी एका ५० वर्षीय महिलेला पोलीस चौकीमध्ये बोलावून मारहाण केली.

विधानसभेच्या अंधेरी (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी !

विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या. त्यांना एकूण ६६ सहस्र ५३० इतकी मते मिळाली.