आरोपी सचिन वाझे यांच्याकडून कारागृहात असभ्य वर्तन !

कारागृह प्रशासनाकडून तक्रार प्रविष्ट !

सचिन वाझे

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी कारागृहातील सुरक्षारक्षकांसमवेत असभ्य वर्तन केले, तसेच त्यांना धमकीही दिली, असा आरोप कारागृह प्रशासनाने केला असून या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. यानंतर वाझे यांनी सत्र न्यायालयात क्षमा मागितली.