गोवा : विद्याप्रबोधिनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा हिंदुत्वनिष्ठ राजकुमार देसाई यांचे निधन

राजकुमार देसाई हे गोमंतक मंदिर महासंघाचे एक सदस्य होते, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातही ते सक्रीय सहभाग घेत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

गोवा : सरकारने कांपाल येथील ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ची निविदा मागे घेतली

कांपालवासियांचा या ‘पार्क’ला विरोध असल्याने सरकारने हा प्रकल्प तेथे न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प अन्य ठिकाणी नेण्यात येणार असून नवीन जागेची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ धर्मांधांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

अमली पदार्थांच्या विक्रीची तक्रार देणार्‍या पुणे येथील महिलेच्या घरामध्ये तोडफोड

राज्यातील ब्रिटीशकालीन मध्यवर्ती कारागृहांची स्थिती गंभीर !

गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पहाता कारागृह प्रशासनाच्या दृष्टीने सर्व स्तरांवर नियोजन करणे अपेक्षित आहे. कारागृहांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास ते कैद्यांच्या मानवाधिकारांचे उल्लघंन ठरेल !

नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्‍या अश्लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

अश्लीलता पसरवणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?

आंबेत पुलाचे काम ८ दिवसांत चालू करा ! – पालकमंत्री उदय सामंत

मागील ३ वर्षांपासून आंबेत येथील पूल नादुरुस्त झाला आहे. या पुलावर आतापर्यंत साडे सोळा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीस बंद आहे. त्यामुळे प्रवाशी नाराज आहेत.

महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मागील १५ दिवसांपासून राज्यातील उद्योगक्षेत्राविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांशी एका मासाभरात श्वेतपत्रिका काढण्यात येईल.

शिवसेनेच्या दोन्ही गटांना म्हणणे सादर करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडून १ मासाचा कालावधी !

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी आपला गट ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला आहे.

ठाणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न !

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवल्याचा आरोप करत ठाणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला.