७ धर्मांधांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

अमली पदार्थांच्या विक्रीची तक्रार देणार्‍या पुणे येथील महिलेच्या घरामध्ये तोडफोड

पुणे – मुंबई-पुणे रस्त्यावरील इराणी वस्तीमध्ये अमली पदार्थांची विक्री चालू असल्याची तक्रार देणार्‍या रुक्साना इराणी या महिलेच्या घरामध्ये घुसून घरातील गृहोपयोगी साहित्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी शब्बीर इराणी, जमीर इराणी, नादर इराणी, फिदा इराणी, जावेद इराणी, जैनत इराणी, सीता शेख यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रुक्साना इराणी यांनी तोडफोडीची तक्रार खडकी पोलीस ठाण्यामध्ये प्रविष्ट केली आहे.

इराणी वस्तीमध्ये चरस, गांजा आणि तत्सम अमली पदार्थांची विक्री चालू असल्याची तक्रार रुक्साना यांनी पोलिसांकडे अर्जाद्वारे केली होती. यावरून रुक्साना आणि कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. याचा राग मनामध्ये धरून वरील आरोपींनी रुक्साना यांच्या घरामध्ये शिरून त्यांचे पती आणि मुलगा यांनाजिवे मारण्याची धमकी देत तोडफोड करण्यात आली असल्याचे समजते.