ठाणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न !

ठाणे, १ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवल्याचा आरोप करत ठाणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला. ठाणे नगर पोलीस पुतळा जप्त करत असतांना पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३१ ऑक्टोबर या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. ‘यापुढे जर असे प्रकल्प पळवले, तर या सरकारला जनता पळवून लावेल’, अशी चेतावणी विक्रम खामकर यांनी दिली.