नागपूर – राज्यभरातील जवळपास सर्वच मध्यवर्ती कारागृहे ब्रिटीशकालीन आहेत. ती आता त्यांची दु:स्थिती होऊ लागली आहेत. कारागृह प्रशासनाकडे शेकडो एकर भूमी उपलब्ध असूनही नवीन कारागृहे उभारली जात नाहीत.
१. कारागृहातील कर्मचारी प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना अजूनही पडक्या किंवा गळक्या घरांमध्येच रहावे लागत आहे.
२. अनेक कारागृहांत क्षमतेपेक्षा दुप्पट बंदीवान ठेवलेले आहेत. त्यामुळे कारागृहातील कर्मचार्यांवर सुरक्षाव्यवस्थेचा अतिरिक्त ताण आहे. अपुर्या सुरक्षाव्यवस्थेमुळे बंदीवान तेथून पळून जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. काही कारागृहांत बंदीवानांकडून कर्मचार्यांना मारहाण केली जाते किंवा त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो.
येरवडा कारागृह हे देशातील सर्वांत मोठे कारागृह असून तेथे ‘हायटेक’ सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीचे वाढते प्रमाण पहाता कारागृह प्रशासनाच्या दृष्टीने सर्व स्तरांवर नियोजन करणे अपेक्षित आहे. कारागृहांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास ते कैद्यांच्या मानवाधिकारांचे उल्लघंन ठरेल ! |