सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून उपवडे येथील धोकादायक शाळेची पहाणी

प्रशासनाला आंदोलनाची आणि बहिष्काराची भाषाच समजते, असे पुन्हा या घटनेतून लक्षात येते ! असे सुस्त प्रशासन काय कामाचे ?

तोतया पोलीस अधिकार्‍याकडून गायकाची अडीच लाखांची फसवणूक !

संगीत कार्यक्रम सादर करण्यासाठी ८ लाख रुपये देण्याचे आमीष दाखवून गायक अशोक निकाळजे यांची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जळगाव येथे गोरक्षकांनी मृत गायीचे कुत्र्यांपासून रक्षण केले !

शहरातील जळगाव ते संभाजीनगर महामार्गालगत अनुमाने रात्री १० वाजता एक गाय मृतावस्थेत पडलेली होती. याविषयीची माहिती शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी यांना मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोचले.

बोलवाड-टाकळी येथील श्री गुरुदेव तपोवनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला !

ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बोलवाड-टाकळी येथील श्री गुरुदेव तपोवनात २६ ऑक्टोबरला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी टाकळी, मिरज, सांगली आणि कागवाड परिसरांतील अनेक जण उपस्थित होते.

इन्सुली (तालुका सावंतवाडी) येथील सनातनचे साधक तथा निवृत्त गटविकास अधिकारी जयदेव नाणोसकर यांचे निधन

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील सनातनचे साधक तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे निवृत्त गटविकास अधिकारी जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे, मूळ गाव नाणोस, तालुका सावंतवाडी) यांचे २९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता इन्सुली येथील रहात्या घरी निधन झाले.

नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण करणार्‍या अधिकार्‍यांना घेराव घालणार ! – गणेश नाईक, आमदार

कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन नवी मुंबई शहरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणार्‍या महापालिकेच्या काही स्वार्थी अधिकार्‍यांना घेराव घालू, अशी चेतावणी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी दिली आहे.

छटपूजा उत्सवात पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी !

उत्तर भारतीय बांधवांकडून शहरातील सर्व घाटांवर छटपूजा उत्सव ३० ऑक्टोबर या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्तांकडून लाचखोर शिपायाचे निलंबन !

ठाणे महानगरपालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणार्‍या कावेसर येथील उपकार्यालयामध्ये मुलीच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या महिलेकडे पैशांची मागणी करून तिच्याकडून शिपायाने ५०० रुपये घेतले.

या जिहादी संघटनेवर बंदी घाला !

मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांचा खटला लढवण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनेकडून अर्थपुरवठा करण्यात आला आहे.

‘भूक सहन करता येणे’ हे आरोग्याचे एक लक्षण !

भूक सहन होत नाही. खाण्याची वेळ झाली की, खावेच लागते; हे शारीरिक क्षमता न्यून असल्याचे लक्षण आहे. भूक सहन होण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी हळूहळू आहाराच्या एकूण वेळा न्यून करून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय लावायला हवी.