तोतया पोलीस अधिकार्‍याकडून गायकाची अडीच लाखांची फसवणूक !

पोलिसांचे भयच राहिले नसल्याचाच हा परिणाम !

मुंबई – संगीत कार्यक्रम सादर करण्यासाठी ८ लाख रुपये देण्याचे आमीष दाखवून गायक अशोक निकाळजे यांची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील एका आरोपीने स्वत: पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली होती.

पोलीस असल्याचे भासवून आरोपीने १४ ऑक्टोबर या दिवशी निकाळजे यांना भ्रमणभाष केला होता. संगीत कार्यक्रमाचे आमंत्रण देत ८ लाख रुपये मानधन देण्याचे आश्वासनही त्याने दिले. काही दिवसांनी अन्य एकाने कनिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगून निकाळजे यांना ‘८ लाख रुपयांचे मानधन मिळवण्यासाठी आधी अडीच लाख रुपये भरावे लागतील’, असे सांगितले. त्यांनी पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

पोलिसांचे भयच राहिले नसल्याचाच हा परिणाम !