जळगाव येथे गोरक्षकांनी मृत गायीचे कुत्र्यांपासून रक्षण केले !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – शहरातील जळगाव ते संभाजीनगर महामार्गालगत अनुमाने रात्री १० वाजता एक गाय मृतावस्थेत पडलेली होती. याविषयीची माहिती शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी यांना मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोचले. तेथे त्यांना काही कुत्रे मृत गायीचे लचके तोडत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी रात्रभर जागून त्या गायीचे कुत्र्यांपासून रक्षण केले. आमदार श्री. सुरेश भोळे यांना या घटनेची माहिती संबंधितांना दिली. पहाटे ३ वाजता गायीचा अंत्यसंस्कार करण्यात आले. (गोरक्षकांचे अभिनंदन !  – संपादक)