प.पू. काणे महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नारायणगाव (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला !

प.पू. काणे महाराज यांच्या पादुकांचे पूजन त्यांचे भक्त श्री. गणेश भुसारी आणि सौ. मनीषा भुसारी यांनी केले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार नवरात्रोत्सवात करण्यात आले देवींच्या कृपेसाठी होम !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या आध्यात्मिक त्रासांचे निवारण व्हावे, यासाठी होमांच्या वेळी करण्यात आला संकल्प !

ऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

आपल्या ऋषी-मुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय त्यांच्या उराशी बाळगले होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. मलकापूर-शाहुवाडी वैद्यकीय संघटनेच्या ‘श्री धन्वन्तरी जयंती’चे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथील बनावट पत्रकारांनी व्यावसायिकांकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळली !

व्यावसायिकाला ‘तुम्ही गोडाऊनमध्ये भेसळयुक्त मालाची विक्री करून पैसा कमावता, आता वृत्तपत्रामध्ये बातमी लावून तुमची अपकीर्ती करतो. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंब संपवून टाकतो’, अशी धमकी देत पैसे वसूल केले.

भारतानेच आता कारवाई करायला हवी !

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाची योजना सिद्ध करणार्‍या मुख्य कारस्थान्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केले.

तरुण बंदीवान कशामुळे झाले ?

एकत्रित कुटुंबपद्धत लोप पावत चालल्याने लहानपणापासून मुलांवर होणारे संस्कार अल्प झालेले आहेत. एकूणच तरुणांची झालेली बिकट स्थिती सावरण्यासाठी त्यांना गुरुकुल शिक्षणपद्धतीचे शिक्षण देणे आणि त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी तशी व्यवस्थाच सरकारने निर्माण करायला हवी.

आईच्या दुधात ‘मायक्रोप्लास्टिक’ आढळणे हे पुढच्या पिढीसाठी धोकादायक !

‘पॉलिमर’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मानवी दुधात प्लास्टिकचे कण आढळले आहेत. या नव्या माहितीमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ‘आईच्या दुधात जर प्लास्टिकचे कण आढळत असतील, तर आगामी नवजात बालके आणि पुढची पिढी यांसाठी हे धोकादायक आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेला हा अभ्यास काय आहे ? ते येथे देत आहोत.

किती जणांना डार्विनचा उत्क्रांतीवाद योग्य वाटतो ?

डार्विनचा चुकीचा उत्क्रांतीवाद आपल्या शास्त्राच्या विरोधात आणि चुकीचा आहे. सरकार आणि शिक्षणतज्ञ यांनी याकडे लक्ष देऊन शालेय शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे, तसेच सनातन धर्म आणि अध्यात्मशास्त्र शिक्षणात अंतर्भूत केले पाहिजे, अशी मागणी सर्वांनी करायला हवी.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘सनातन त्रिफळा चूर्ण’

‘प्रतिदिन रात्री झोपतांना त्रिफळा चूर्ण मध-तुपासह घेतल्याने डोळ्यांची शक्ती वाढते’, असे ‘अष्टांगहृदय’ या आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे.’