पुणे येथील बनावट पत्रकारांनी व्यावसायिकांकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळली !

पुणे – व्यावसायिकाला दमदाटी करत हत्या करण्याची धमकी देत बनावट पत्रकारांनी ५ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ४२ वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

व्यावसायिकाला ‘तुम्ही गोडाऊनमध्ये भेसळयुक्त मालाची विक्री करून पैसा कमावता, आता वृत्तपत्रामध्ये बातमी लावून तुमची अपकीर्ती करतो. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंब संपवून टाकतो’, अशी धमकी देत पैसे वसूल केले.