बोरीवली येथे ३ मजली इमारतीचा भाग कोसळला !

ढिगार्‍याखाली ४-५ चारचाकी गाडल्या गेल्या

बोरीवली (मुंबई) – येथील वझिरा नाका परिसरातील ३ मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली ४-५ चारचाकी गाडल्या गेल्या. यात गाड्यांची पुष्कळ हानी झाली आहे. जीवितहानीविषयी अद्याप काहीही समजलेले नाही. इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. इमारतीचा भाग कशामुळे कोसळला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.