ऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

उपस्थितांकडून नामजप करवून घेतांना वैद्य संजय गांधी

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – श्री धन्वन्तरी देवता सर्व मानवांना आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. भारत देशाची ‘हिंदु संस्कृती’ श्रेष्ठ दर्जाची असून सारे जग आता आपले अनुकरण करत आहे. आपल्या ऋषी-मुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय त्यांच्या उराशी बाळगले होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. मलकापूर-शाहुवाडी वैद्यकीय संघटनेच्या ‘श्री धन्वन्तरी जयंती’चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित वैद्य आणि औषध विक्रेते यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याचा लाभ ४० जणांनी घेतला.

विशेष : उपस्थितांकडून ‘श्री धन्वन्तरये नम:’ हा नामजप करवून घेण्यात आला, तसेच कडुलिंबाचा प्रसाद वाटण्यात आला.