मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट करणार्‍यावर गुन्हा नोंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी प्रदीप भालेकर यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात २३ ऑक्टोबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी !

‘फोन टॅपिंग’ प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे खच्चीकरण करणारे वृत्तांकन केल्याचा आरोप करत अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी दैनिक ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने पुणे येथे निधन !

मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात पूजा !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात पूजा करण्यात आली होती.

सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील क्रीडांगणांची दुरवस्था !

जिल्ह्यातील क्रीडांगणे सुस्थितीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची इच्छाशक्तीच हवी !

परतीच्या पावसाने झालेल्या हानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

जे लोकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे, ते सरकार घेत आहे. याची कार्यवाही तात्काळ होत आहे. शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या अधिकोषात जमा होत आहेत. दीपावलीच्या कालावधीत परतीच्या पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. याचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.

काचेच्या बाटलीत फटाके फोडण्यास नकार देणार्‍या तरुणाची ३ अल्पवयिनांकडून हत्या !

संवेदनशीलता संपत चालल्याने मुलांमध्ये हिंसकता वाढत चालली आहे, हे दर्शवणारी घटना !

‘ऋषी’राज !

ब्रिटनमध्ये आज जी अत्यंत बिकट आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, ती सावरण्यासाठी एक भारतीय वंशाची ‘ऋषी’ नाव असलेली व्यक्ती सज्ज झाली आहे, हा केवळ योगायोग नव्हे, तर ही कालगती आहे. भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांचा पंतप्रधान हिंदु वंशीय होणे, ही कालगतीच !

वसई, विरार आणि नायगाव येथे ६ ठिकाणी, तर ठाणे येथे ५ ठिकाणी आग !

वसई येथे २४ ऑक्टोबर या दिवशी चपलांच्या गोदामाला आग लागली. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी गोदामाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वसई, विरार आणि नायगाव येथे ६ ठिकाणी, तर ठाणे येथे ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

कल्याण-डोंबिवली येथे विनाअनुमती उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानांवरील कारवाई थंड !

उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, कायदे आणि नियम यांचे उल्लंघन होत असतांनाही प्रशासन आणि पोलीस यांच्याकडूनही बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.