वसई, विरार आणि नायगाव येथे ६ ठिकाणी, तर ठाणे येथे ५ ठिकाणी आग !

प्रतिकात्मक छायाचित्र

वसई – येथे २४ ऑक्टोबर या दिवशी चपलांच्या गोदामाला आग लागली. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी गोदामाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वसई, विरार आणि नायगाव येथे ६ ठिकाणी, तर ठाणे येथे ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

औंध (पुणे) येथेही एका घरात आग लागली होती. रात्री अग्नीशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी आल्या होत्या.