युक्रेनमधील भारतियांनी तातडीने देश सोडावा ! – भारत सरकारचा सल्ला

भारतीय नागरिकांच्या साहाय्यासाठी दूतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१ आणि + ३८०६७८७४५९४५ हे ३ हेल्पलाईन क्रमांकही प्रसारित करण्यात आले आहेत.

बांगलादेशमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून श्री काली मंदिरावर आक्रमण

बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

व्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार ! – निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा

कर न भरता व्यवसाय करण्यातून मत्स्यव्यावसायिकांची नीतीमत्ता किती ढासळली आहे, ते दिसून येते. समाजात प्रामाणिकपणा अपवादानेच दिसून येतो, याचे कारण त्यांना धर्मशिक्षण नसणे, हेच आहे !

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !

हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांच्या, क्रूरतेच्या, बलात्कारांच्या, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत . . . हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबईतील व्यापार्‍याकडून केदारनाथ मंदिरात सोन्याचा पत्रा बसवला जाणार !

मुंबई येथील एका व्यावसायिकाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरातील गाभार्‍यात चांदीचा पत्रा असलेल्या भिंतीवर सोन्याचा पत्रा बसवण्यात येत आहे. यासाठी २३० किलो सोने वापरण्यात आले आहे. या सोन्याच्या पत्र्यावर भगवान शंकराचे प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हे कोरण्यात आली आहेत.

भारतासह जगभरात दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

वर्ष २०२२ मधील शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर या दिवशी भारताचा काही भाग वगळता सर्वत्र पहाता आले. खंडग्रास असणार्‍या या ग्रहणाचे वेध पहाटे साडेतीन वाजल्यापासून लागले होते.

‘व्हॉट्स ॲप’ची जगभरातील सेवा २ घंटे ठप्प !

‘व्हॉट्स ॲप’ची सेवा अचानकपणे खंडित झाल्यामुळे वापरकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काहींचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने हानी झाली, तर काहींचे महत्त्वाचे निरोप पोचू न शकल्याने अडचणी आल्या.

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

हिंदु समाजातील ग्राहकांना सक्तीने ‘हलाल प्रमाणित’ खाद्यपदार्थ दिले जाऊ नयेत, त्यांना हलाल प्रमाणित नसलेले खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात यावे.

कवलापूर (जिल्हा सांगली) येथील विमानतळाची जागा अल्प मूल्यात देण्याचा प्रयत्न !

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘या जागेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. वास्तविक या भूखंडाचा लाभ येतील भूमीपुत्रांनाच मिळाला पाहिजे. असे न झाल्यास आम्ही पंचक्रोशीतील नागरिकांना एकत्र करून जनआंदोलन उभारू.”

संभाजीनगर येथील ‘अजित सीड्स’ आस्थापनातील ६ लाख रुपयांच्या बियाणे चोरीप्रकरणी निरीक्षकासह ३ जणांना अटक !

‘अजित सीड्स’च्या फारोळा येथील प्लांटमधून २४ ऑक्टोबर या दिवशी अफरातफर करून आस्थापनातून ६ लाख रुपयांचे बियाणे चोरण्यात आले. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी ६ लाख रुपयांच्या बियाण्यांची चोरी करणार्‍या टोळीला कह्यात घेतले.