इस्लामाबाद – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुढील ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तेथील निवडणूक आयोगाने एका प्रकरणाच्या सदंर्भात हा आदेश दिला. खान पंतप्रधानपदी असतांना त्यांना विदेशी अधिकार्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंविषयीची त्यांनी निवडणूक आयोगाला वस्तूनिष्ठ माहिती पुरवली नाही, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
खान या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. ‘निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारची बंदी लादली जाऊ शकत नाही’, असे त्यांचे म्हणणे आहे.