भारताच्या ‘अग्नी प्राईम’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण !

‘अग्नी प्राईम’ क्षेपणास्त्र

बालासोर (ओडिशा) – भारताने २१ ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील बालासोर येथून ‘अग्नी प्राईम’ नावाच्या परमाणू शस्त्रास्त्रे नेण्याची क्षमता असणार्‍या नव्या पिढीतील क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे क्षेपणास्त्र भारतीय बनावटीचे असून मध्यम अंतरापर्यंत मारा करू शकते, असे संरक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. ‘अग्नी प्राईम’ची ही तिसरी सलग यशस्वी चाचणी झाली आहे. ‘अग्नी प्राईम’ हे क्षेपणास्त्र भूमीपासून भूमीपर्यंत १ ते २ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.