भाजपचे जमाल सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी !

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गेल्याचे प्रकरण

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी

नागपूर – भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याने त्यांच्या कार्यालयात त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र प्राप्त झाले आहे. जमाल सिद्दीकी यांना आलेल्या धमकीच्या पत्रात ‘रसूल ए पाक की शान में सर तन से जुदा’ (पवित्र अशा महंमद पैगंबर यांचा मान राखण्यासाठी डोके धडापासून वेगळे करा !) असे लिहिले आहे. दुसरीकडे ‘आपण अशा कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही’, असे सिद्दिकी यांनी सांगितले आहे.

१. काही दिवसांपूर्वी जमाल सिद्दीकी संघाच्या गुरुदक्षिणा कार्यक्रमात उपस्थित होते.  कार्यक्रमाचे छायाचित्र धमकी पत्रासमवेत जोडण्यात आले आहे. या प्रकरणी सिद्दीकी यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

२. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे नुकत्याच झालेल्या दंगलीत काही धर्मांधांनी ‘रसूल ए पाक की शान में सर तन से जुदा’ ही घोषणा दिली होती. अशा १० जणांना पोलिसांनी अटक केली होती.

३. ‘रसूल ए पाक की शान में सर तन से जुदा’ या घोषणेवर सामाजिक माध्यमांद्वारेही बंदी घालण्याची मागणी होत आहेे.