मुंबईतील शाळेतील उद्वाहनात अडकून शिक्षिकेचा मृत्यू !

मालाड परिसरात उद्वाहनात अडकल्यामुळे २६ वर्षीय शिक्षिका जेनेले फर्नांडिस यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र गंभीररित्या घायाळ झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी चालू केली आहे.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत लेखी सूचना द्या ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन 

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समाविष्ट कामाविषयी १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी खासदार, आमदार, मंदिर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली.

कोल्हापुरातील म्हशींचे दूध कट्टे बंद ठेवू नका !

कोल्हापूर जिल्ह्यामध्येही लंपी चर्मरोगाचा वेगाने प्रसार होत असल्याने पशूधन मालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा संसर्ग केवळ गायींमधून होत असल्याने कोल्हापूर शहरात म्हशींचे दूध कट्टे बंद करू नयेत..

तासगाव (सांगली) तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कंत्राटी पशूधन पर्यवेक्षक नेमा ! – शिवसेना

तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्याकडे शिवसैनिकांची निवेदनाद्वारे मागणी

लातूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन उत्साहात साजरा !

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाला ७४ वर्षे पूर्ण झाली असून हे अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठवाड्यातील जनतेच्या मुक्ती लढ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या लढ्यातील हुतात्म्यांना, लढ्यात सक्रीय सहभागी असणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो.

गोव्यात स्थानिक विक्रेत्यांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवल्यामुळे झालेले जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे तरंगत किनार्‍यावर आल्याने झालेले देवतेचे विडंबन याला सर्वस्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाच उत्तरदायी का धरू नये ?

पहाटे ६ वाजेपर्यंत काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना खड्डे दिसत नाहीत का ?

सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही का ? असा प्रश्न खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला.

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !

बनावट क्रीडा प्रमाणपत्राद्वारे नोकरी करणार्‍यांची नियुक्ती रहित !

सरकारी सेवेत घेण्यासाठी काही उमेदवारांनी क्रीडा प्रकारामध्ये निपुण असल्याचे सांगितले. बनावट क्रीडा प्रमाणपत्राद्वारे राज्य सरकारच्या सेवेत विविध प्रकारच्या पदांवर नोकरी करणार्‍या तिघांपैकी एकावर जलसंपदा विभागाकडून कारवाई करण्यात आली.

कोंढवा खुर्द येथील ४ मजली इमारतीचा वर्षभरात २० हून अधिक वेळा विक्रीचा व्यवहार !

कोंढवा खुर्द येथील ४ मजली इमारत वर्षभरात २० हून अधिक वेळा विकली गेली, तसेच त्यावर कोट्यवधींचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना कह्यात घेतले आहे.