मुंबईतील शाळेतील उद्वाहनात अडकून शिक्षिकेचा मृत्यू !

मुंबई – मालाड परिसरात उद्वाहनात अडकल्यामुळे २६ वर्षीय शिक्षिका जेनेले फर्नांडिस यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र गंभीररित्या घायाळ झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी चालू केली आहे.

मालाड (मुंबई) येथील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका जेनेले फर्नांडीस या १७ सप्टेंबर या दिवशी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना शिकवून सहाव्या मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहनात शिरत होत्या. या वेळी उद्वाहन यंत्र पूर्ण बंद होण्याआधीच ते सातव्या मजल्यावर गेले. यात फर्नांडिस यांचा एक पाय बाहेरच राहिल्याने त्या गंभीररित्या घायाळ झाल्या. शिक्षक, तसेच कर्मचारी यांना शिक्षिकेला रुग्णालयात भरती केले; पण त्यांना मृत घोषित करण्यात आले.