बनावट क्रीडा प्रमाणपत्राद्वारे नोकरी करणार्‍यांची नियुक्ती रहित !

जलसंपदा विभागाने केलेली कारवाई

पुणे – सरकारी सेवेत घेण्यासाठी काही उमेदवारांनी क्रीडा प्रकारामध्ये निपुण असल्याचे सांगितले. बनावट क्रीडा प्रमाणपत्राद्वारे राज्य सरकारच्या सेवेत विविध प्रकारच्या पदांवर नोकरी करणार्‍या तिघांपैकी एकावर जलसंपदा विभागाकडून कारवाई करण्यात आली. संबंधित नोकरदाराच्या नियुक्तीचे आदेश रहित केल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

क्रीडा प्रमाणपत्रावर आधारित काही उमेदवारांना जलसंपदा विभागात पदांवर रुजू करून घेण्यात आले होते; मात्र त्यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्राविषयी सत्यता समोर आली. क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी वैधता अहवाल रहित करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.