तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्याकडे शिवसैनिकांची निवेदनाद्वारे मागणी
तासगाव (जिल्हा सांगली), १८ सप्टेंबर (वार्ता.) – तासगाव तालुक्यात १ लाख २५ सहस्र इतके पशूधन असून त्यात आधुनिक वैद्यांची संख्या केवळ १४ इतकी आहे. त्यातील १२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सव्वा लाख पशूधनाची भिस्त १४ जणांवरच दिसून येते. शेतकर्यांचे उदरनिर्वाहाचे साधन दुग्ध व्यवसाय असल्याने त्यामुळे ‘लंपी’सारख्या महाभयानक रोगाची साथ येण्यापूर्वीच लसीकरण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ‘गाव तेथे कंत्राटी’ पशूधन पर्यवेक्षक नेमून तालुक्यातील सर्व पशूधनाचे लसीकरण करावे, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार रवींद्र रांजणे यांना देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लसींचा विनामूल्य पुरवठा व्हावा, तसेच साहाय्यक पशूसंवर्धन आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शतप्रतिशत लसीकरण व्हावे. या प्रसंगी शहरप्रमुख विशाल शिंदे, शिवसेनाप्रणीत शिव सामर्थ्यसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष पुरण मलमे, अल्पसंख्यांक आघाडीचे जॉनभाई, सुशांत पैलवान, दत्तात्रय थोरात यांसह अन्य उपस्थित होते.