पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून आक्रमणाची शक्यता

खलिस्तानी आतंकवाद्यांची नांगी यापूर्वी ठेचण्यात आलेली आहे. आता त्यांची पुन्हा वळवळ चालू आहे.  या आतंकवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढण्यापूर्वीच त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !

लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) येथील गावामध्ये हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतराचा प्रयत्न : दोघांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी भाजप सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

कर्नाटकमध्ये श्री गणेश मंडपांत श्री गणेशमूर्तीच्या शेजारी वीर सावरकरांचे छायाचित्र लावणार ! – हिंदु संघटनांचा निर्णय

गणेशोत्सवात वीर सावरकरांविषयी जनजागृती करणार ! – प्रमोद मुतालिक

साधनेमुळे होणारा परिणाम

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वीज आणि पाणी ग्राहकांसाठी ‘क्यू.आर्. कोड बिलींग’ सुविधा उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘स्मार्ट वॉटर मिटरींग’च्या माध्यमातून महसूल गोळा करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ! गोव्यातील पिण्याचे पाणी १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून तपासले जाते.’’

जपानमध्ये एका दिवसात सापडले कोरोनाचे अडीच लाख नवे रुग्ण !

जपान कोरोनाच्या सातव्या लाटेचा सामना करत आहे. तेथे एका दिवसात तब्बल अडीच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. १९ ऑगस्ट या दिवशी जपानमध्ये २ लाख ६१ सहस्र २९ रुग्णांची, तर १८ ऑगस्ट या दिवशी २ लाख ५५ सहस्र ५३४ रुग्णांची नोंद करण्यात आली.

शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.

हरिहरेश्वर समुद्रकिनार्‍यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीत २ तलवारी आणि चाकूही सापडले !

या घटनेनंतर कोकण आणि पुणे येथे सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल आणि लॉज येथे पोलिसांनी धाडी टाकून संशयितांची चौकशी चालू केली आहे.

राज्यात अपंगत्व प्रमाणपत्राची ३ लाख ४१ सहस्र प्रकरणे प्रलंबित !

इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित कशी रहातात ? आरोग्य विभागाच्या ते लक्षात येत नाही का ? यासाठी कारणीभूत असणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी

विशाळगड येथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

विशाळगड येथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे, अशी मागणी सातारा येथील ‘हिंदु एकता आंदोलन’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केली. विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात विठ्ठल मंदिर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.