गोवा : कुंकळ्ळे, म्हार्दाेळ येथे चोरट्यांची वाहने गावातील ‘राखणदारा’ने अडवल्याची स्थानिकांची श्रद्धा !

“आम्ही असे मानतो की, पहाटेच्या वेळी राखणदाराची फेरी या वाटेवर असते. जेव्हा हा प्रकार घडला, तेव्हाही तोच प्रहर होता.’’ याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?

न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच, असे नाही ! – धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय

जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटीहून अधिक आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ सहस्र खटले प्रलंबित आहेत.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ !

कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी ३ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस कर्मचारी आणि ३४ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, तसेच धरणाच्या सुरक्षेची प्रत्येक घंट्याला पहाणी केली जात आहे.

हिंदूंवरील जिहादी आक्रमणे आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात खोपोली येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !

हिंदूंच्या हत्या, जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिळफाटा, खोपोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २० ऑगस्ट या दिवशी आंदोलन करण्यात आले. 

राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानाच्या रकमेत १५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री 

राज्यातील ग्रंथालयांना थकित अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल. राज्यातील ग्रंथालयांना १२२ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. ते अनुदान १५० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.

मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आता मुंबईकरांसाठी काम करणार्‍यांना आपण निवडून आणायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिशोब द्या !

अनेक गोष्टी विनामूल्य देण्याचे आमीष देऊन सरकार स्थापन झाले, तरी ते चालवण्यासाठी लागणारी नीतीमत्ता आपकडे दिसलेली नाही, हेच सत्य आहे ! बाकी राजकारण आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या २ बाजू झालेल्या आहेत. आपचे सरकारही त्याला अपवाद राहिलेले नाही, हे पुन: पुन्हा समोर येत आहे !

मुंबईत दहीहंडी उत्सवात १५३, तर ठाणे येथे ६४ गोविंदा घायाळ !

दहीहंडी उत्सवात १९ ऑगस्ट या दिवशी दिवसभरात मुंबई येथे १५३ गोविंदा घायाळ झाले होते. त्यांपैकी १३० जणांना उपचार करून सोडून देण्यात आले, तर उर्वरित २३ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काकरमल (जिल्हा अमरावती) येथे मद्यधुंद शिक्षकाने विद्यार्थ्यांना घरी पाठवून वर्गात झोप काढली !

असे मद्यधुंद शिक्षक विद्यार्थ्यांना आदर्श काय करणार ? असे शिक्षक शैक्षणिक क्षेत्राला कलंकच आहेत. अशांना बडतर्फच करायला हवे !

जुन्या ‘आर्.टी.ओ.’च्या स्वाक्षर्‍या करून ‘जेसीबी’ यंत्राची सिद्ध केली बनावट कागदपत्रे !

येथील जुन्या ‘आर्.टी.ओ.’ अधिकार्‍याच्या स्वाक्षर्‍या करून एका ‘जेसीबी’ यंत्राची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि दलाल सय्यद शाकेर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा ..