शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !

आतंकवादी राजिंदर

मुंबई – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे. (आतंकवादग्रस्त महाराष्ट्र ! – संपादक) १६ ऑगस्ट या दिवशी पंजाब पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाच्या गाडीला स्फोटके (आय.ई.डी.) लावून ती उडवण्याचा त्याने कट आखला होता, असा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीला पंजाब आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात देण्यात आले आहे.