विशाळगड येथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

मार्गदर्शनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २० ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगड येथील अतिक्रमण प्रशासनाने त्वरित हटवावे, अशी मागणी सातारा येथील ‘हिंदु एकता आंदोलन’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी केली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात विठ्ठल मंदिर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीसाठी सांगली, कराड, मलकापूर, कवठेमहांकाळ येथील ८० युवक यांच्यासह भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूर उत्तरचे ‘युवा व्यापारी असोसिएशन’चे सर्वश्री महेश विभुते, चेतन गुजर, उत्तम शिंगटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अनिकेत हिरवे, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

बैठकीतील सूत्रे

१. विशाळगडावर ‘एन्.ए. प्लॉट विकणे’, असे विज्ञापन होत असल्याने त्या संदर्भात २२ ऑगस्ट या दिवशी तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरले.

२. प्रारंभी श्री. विक्रम पावसकर यांनी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी विशाळगडाच्या संदर्भात जी माहिती उघड केली आणि आंदोलन केले त्याची प्रशंसा केली.

३. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने गडसंवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

संपादकीय भूमिका

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासन उदासीनता का दाखवत आहे ?