युरोपात दुष्काळामुळे हाहा:कार !

नैसर्गिक संकटाची तीव्रता ! स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले. या देशांत जुलै मासात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान नोंदवले गेले. स्पेनमध्ये उष्णतेने तर ६० वर्षांचा विक्रम मोडला !

राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ आदींची विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

असे विधान केल्याच्या प्रकरणी जलील यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर

या निवेदनामध्ये ‘या उपक्रमानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक जपण्यात यावेत, तसेत प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येऊ नये’, अशीही विनंती करण्यात आली आहे.

भारत रशियाकडून ‘बाँबर’ विमाने खरेदी करणार !

रशियाकडून युद्धसाहित्य खरेदी करतांना भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युद्धसाहित्य निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भर’ होणेही आवश्यक आहे !

चामराज पेटे मैदान ही जमीर अहमद खान यांच्या वडिलांची संपत्ती आहे का ?

हे मैदान अनेक वर्षांपासून ‘ईदगाह मैदान’ म्हणून मुसलमानांकडून वापरण्यात येत होते. आता हे मैदान सरकारचे असल्याचे घोषित केल्यानंतर आता हिंदूंनी तेथे गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मागितली आहे.

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. या मूर्ती खरेदी करणारे सैफुद्दीन आणि जकारिया अनवर यांनाही अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्‍यास अटक

आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?