गोव्यात गेल्या ५ वर्षांत बलात्कार, मुलींचे अपहरण, हत्या आदी गुन्ह्यांच्या प्रतिवर्ष सरासरी प्रमाणात पालट नाही !

गोवा विधानसभा अधिवेशन पणजी, २० जुलै (वार्ता.) – राज्यात वर्ष २०१७ पासून वर्ष २०२२ (जून २०२२ पर्यंत) पर्यंत बलात्कार, हत्या, अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि सायबर गुन्हे आदींमध्ये घट झालेली नाही. विधानसभेत सरकारने दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील गुन्ह्यांसंबंधी तालुकावार, तसेच हळदोणाचे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, बाणावलीचे आपचे आमदार … Read more

सडा, वास्को येथे इयत्ता ९ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीची आत्महत्या

सडा, वास्को येथे रहाणार्‍या सुमित्रा मेल्पापूर या एका १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

सावंतवाडी येथे ‘सकल हिंदु समाज मेळाव्या’चे आयोजन

सध्यातर धर्मद्वेष जीवघेणा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणतीही जात अथवा पंथ यांचे असलो, तरी केवळ हिंदु म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत धर्मरक्षणासाठी विचारमंथन करणे आवश्यक आहे.

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणण्यातील फोलपणा !

‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्‍याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली !

शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार्‍या आमदारांचे सदस्यत्व रहित करण्याविषयी शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

वर्धक मात्रा घेण्यासाठी तब्बल ५ कोटी नागरिकांची नापसंती !

१८ वर्षांवरील सर्वांना लसीची वर्धक मात्रा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला, तरीही मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत वर्धक मात्रा लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

कुरेशी याने मोनू गुप्ता बनून हिंदु मुलीवर केला बलात्कार

प्रिंस कुरेशी नावाच्या मुसलमानाने ‘मोनू गुप्ता’ या नावाने देहली येथील एका हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्न करण्याचे खोटे वचन देऊन कासगंज येथे बोलावले. याठिकाणी त्याने मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.

चेन्नई येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातनच्या ग्रंथांतील मार्गदर्शन प्रत्येकाने आचरणात आणले, तरच आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हरिहरबुक्का निर्माण होऊ शकतात’’, असे मार्गदर्शन श्री. बालगौथमन्जी यांनी केले.

सातारा येथे ४ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या ग्रामसेवकाला रंगेहात पकडले !

तालुक्यातील पाटखळ येथील ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख यांना ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पूर्ण केलेल्या कामाचे देयक संमत करण्यासाठी ग्रामसेवक दीपक देशमुख यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली.