वर्धक मात्रा घेण्यासाठी तब्बल ५ कोटी नागरिकांची नापसंती !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कोरोना महामारीची तीव्रता अल्प झाल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस, तसेच वर्धक मात्रा घेण्यास ५ कोटी नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने यासंदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग न्यून झाला असला, तरी तो समूळ नष्ट झालेला नाही. त्यामुळे ‘नागरिकांनी वर्धक मात्रा घेण्यासाठी टाळाटाळ करू नये’, असे आवाहनही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने केले आहे.

१८ वर्षांवरील सर्वांना लसीची वर्धक मात्रा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला, तरीही मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत वर्धक मात्रा लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.