सावंतवाडी येथे ‘सकल हिंदु समाज मेळाव्या’चे आयोजन

सावंतवाडी – आजच्या आधुनिक युगात भौतिक प्रगती प्रचंड प्रमाणात होऊनही माणसाला मानसिक शांती प्राप्त होत नाही. यासाठी धर्मरक्षण आणि धर्माचरण हाच एकमेव उपाय आहे. आज अनेक धर्मद्वेषी प्रवृत्ती विशेषत्वाने आपल्या हिंदु धर्मावर आघात करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. सध्यातर धर्मद्वेष जीवघेणा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणतीही जात अथवा पंथ यांचे असलो, तरी केवळ हिंदु म्हणून आपण सर्वांनी एकत्र येत धर्मरक्षणासाठी विचारमंथन करणे आवश्यक आहे. यासाठी रविवार, २४ जुलै २०२२ या दिवशी शहरातील कळसुलकर हायस्कूल येथे दुपारी ३  वाजता ‘सकल हिंदु समाज मेळावा’ आयोजित केला आहे. या मेळाव्यात धर्माचरण आणि सांघिक उपासना, हिंदूंची सर्वांगीण सुरक्षितता, धर्मांतर आणि उपाययोजना, हिंदु सण आणि त्यांवर होणारी आक्रमणे, हिंदूंवर होणारी आतंकवाद्यांची आणि धर्मांधांची आक्रमणे, लोकसंस्था असंतुलन अन् त्याचे परिणाम, समान नागरी कायद्याची आवश्यकता आणि जागृत हिंदु समाजाची आवश्यकता का ?, या विषयांवर चर्चा होणार आहे. या मेळाव्यास सर्वांनी अवश्य उपस्थित राहून धर्मकार्यात योगदान द्यावे.

अधिक माहितीसाठी अजित फाटक (९६०४०१७८०८), सुनील सावंत (९४२१९२९४७७) आणि रवी सातवळेकर (९४२३३०५११०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘सकल हिंदु समाज विचारवंत’, प्रखंड-सावंतवाडी यांनी केले आहे.