सातारा येथे ४ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या ग्रामसेवकाला रंगेहात पकडले !

सातारा, २० जुलै (वार्ता.) – तालुक्यातील पाटखळ येथील ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख यांना ४ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पूर्ण केलेल्या कामाचे देयक संमत करण्यासाठी ग्रामसेवक दीपक देशमुख यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. त्यामुळे त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. या वेळी दीपक देशमुख यांना लाच घेतांना पकडतांना पकडण्यात आले. याविषयी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.