पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथील दुकानांतून पाकिस्तानी जिहादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’साठी गोळा केले जातात पैसे !

जिहादी संघटनेसाठी भारतात अशा प्रकारे पैसे गोळा केले जात असतांना सुरक्षायंत्रणांना त्याविषयी माहितीही नसणे, हे लज्जास्पद ! आतंकवादी संघटनेसाठी पैसे मागणारे आणि त्यासाठी पैसे देणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

केंद्र सरकार आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात कायदा करण्याच्या सिद्धतेत !

देशामध्ये आक्षेपार्ह, द्वेष पसरवणार्‍या, भावना दुखावणार्‍या विधानांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार या संदर्भात कठोर कायदा करण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे.

‘काली’ नावाच्या माहितीपटात श्री कालीमातेला सिगरेट ओढतांना दाखवले !

भारतात पाकिस्तानमध्ये असलेल्या ईशनिंदाविरोधी कायद्यासारखा कायदा नसल्याने अशा प्रकारे देवतांचा अवमान करणारे मोकाट रहातात. केंद्र सरकारनेही आता फाशीची शिक्षा असणारा कायदा तत्परतेने करावा, असेच हिंदूंना वाटते !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील बाँबस्फोटांच्या प्रकरणी ५ जिहादी आतंकवाद्यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशा आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत असतांना भारत मोठ्या प्रमाणात त्याला साहाय्य करत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने मात्र भारतीय मासेमारांवर अशा प्रकारे कारवाई करणे, हा भारताचा विश्‍वासघात !

एकनाथ शिंदे सरकारने विश्‍वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकला !

प्रस्तावाच्या बाजूने भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्या १६४ आमदारांनी, तर विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या ९९ आमदारांनी मतदान केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ५ आमदारांनी मतदान केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूरत-चेन्नई महामार्गाची मोजणी ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार !

सूरत-चेन्नई महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. ५ जून २०२२ पासून भूमी मोजणीचे काम चालू करण्यात आले होते. हे काम समुहाने गतीने केल्याने अंतिम टप्प्यात असून ११ जुलैपर्यंत पूर्ण..