गोध्रा हत्याकांडातील रफीक भटुक याला जन्मठेपेची शिक्षा

गोधरा (गुजरात) – येथील रेल्वे स्थानकावर वर्ष २००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसमधील ५९ कारसेवकांना (अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी आंदोलन करणारे) जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील आरोपी रफीक भटुक याला दोषी ठरवून येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेच्या १९ वर्षांनंतर रफीक याला गोधरा येथे अटक करण्यात आली होती. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला तो ३५ वा आरोपी आहे. यापूर्वी मार्च २०११ मध्ये विशेष न्यायालयाने ३१ जणांना, तर वर्ष २०१८ मध्ये २ आणि वर्ष २०१९ मध्ये १ आरोपी यांना दोषी ठरवले होते.

संपादकीय भूमिका

अशांना फाशीचीच शिक्षा योग्य होती, असेच जनतेला वाटते !