श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मासेमारांना अटक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी करण्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने १२ भारतीय मासेमारांना अटक केली आहे.

(श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत असतांना भारत मोठ्या प्रमाणात त्याला साहाय्य करत आहे. दुसरीकडे श्रीलंकेने मात्र भारतीय मासेमारांवर अशा प्रकारे कारवाई करणे, हा भारताचा विश्‍वासघात होय ! श्रीलंकेच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे, हे प्रथम पडताळून पहाणे आवश्यक ! – संपादक)