आणखी एकही झाड न तोडता एक वर्षात आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. आम्ही लोकांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. विलंबामुळे या कामाचा व्यय १०-१५ सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. एका वर्षात एकही झाड न तोडता आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू

शासनाचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आज मतदान !

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा !

१० जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !

महाराष्ट्र विधानसभेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन ३ जुलैपासून चालू झाले. अधिवेशनासाठी विधानभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै या दिवशी सकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन २४ घंटे चालू !

आषाढी वारीच्या निमित्ताने १ जुलैपासून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २४ घंटे चालू ठेवण्यात आले आहे. १० जुलै या दिवशी आषाढी वारी असून यानिमित्त पायी पालखी सोहळ्यासमवेत राज्यातील आणि परराज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येतात.

केंद्रीय यंत्रणेकडून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना सावध रहाण्याची चेतावणी !

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानावरून देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून सावध रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

अमरावती हत्या प्रकरणातील धर्मांधांची रवानगी पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत !

औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या ७ आरोपींपैकी डॉ. युसूफ खान याला न्यायालयाने ६ जुलैपर्यंत, तर अन्य आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा येथील सनातनचे साधक श्री. चैतन्य लोंढे यांची देहली येथे उच्च शिक्षणासाठी निवड !

सनातनचे साधक सौ. सुलभा आणि श्री. सुनील लोंढे यांचे सुपुत्र श्री. चैतन्य लोंढे हे स्पर्धा परीक्षा गेट AIR 94 (ऑल इंडिया रँक) आणि नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

विधानभवनातील शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यालयाला टाळे ठोकले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ३ जुलै या दिवशी शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय बंद केले. एकनाथ शिंदे गटाकडून विधीमंडळ सचिवांना याविषयीचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विधानभवनात दुसर्‍या मजल्यावर असलेले विधीमंडळ पक्ष कार्यालय बंद करण्यात आले.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच !

अवघ्या काही घंट्यांपूर्वी शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपांखाली आढळराव पाटील यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते