औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव संमत !

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव २९ जून या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.

राजसमंद (राजस्थान) येथे आंदोलकांनी केलेल्या आक्रमणात पोलीस हवालदार घायाळ

उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैय्यालाल या हिंदूचा शिरच्छेद केल्याच्या आरोपाखाली दोन्ही मुसलमानांना राजसमंद येथून अटक करण्यात आली.

उदयपूरची घटना ही भारतातील १०० कोटी हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्‍न ! – हिंदु जनजागृती समिती

या घटनेवरून हिंदु समाजाने जागृत होऊन संघटित होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चालय कार्यालयाकडून तिस्ता सेटलवाड यांच्या सुटकेची मागणी  

भारताने कठोर शब्दांत सुनावले !

मदरशांत मुलांना ‘ईशनिंदा’ करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची शिकवण दिली जाते ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

केंद्र सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ?

दोषींना तात्काळ ठार केले पाहिजे !

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांची मागणी
कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण

बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच हे द्योतक आहे ! भाजपच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन संबंधितांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

कर्नाटक सरकार ‘काशी यात्रा’ करू इच्छिणार्‍यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये देणार !

कर्नाटकच्या भाजप शासनाचे अभिनंदन ! अशा योजना अन्य भाजपशासित राज्यांनीही राबवाव्यात, असेच हिंदूंना वाटते !

दोषींची हत्या करून त्यांना धडा शिकवा ! – कर्नाटकचे माजी मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा

राजस्थानमधील कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे आवाहन न करता कायदेशीररित्या तात्काळ कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !

सीमेवर भारत आणि पाक यांच्या सैन्याधिकार्‍यांची बैठक पार पडली

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर २९ जून या दिवशी भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’चे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.