राजसमंद (राजस्थान) येथे आंदोलकांनी केलेल्या आक्रमणात पोलीस हवालदार घायाळ

उदयपूर येथे कन्हैय्यालाल यांचा शिरच्छेद केल्याचे प्रकरण

राजसमंद (राजस्थान) – उदयपूर येथे २८ जून या दिवशी कन्हैय्यालाल या हिंदूचा शिरच्छेद केल्याच्या आरोपाखाली दोन्ही मुसलमानांना राजसमंद येथून अटक करण्यात आली. त्यामुळे येथील स्थिती तणावपूर्ण आहे. हत्येच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या वेळी काही युवकांनी पोलीस हवालदारांवर धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. त्यात ते गंभीर घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

पोलिसांना स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही का ?