हत्येमागे तृणमूलच्या गुंडांचा हात असल्याचा भाजपचा आरोप

कोलकाता – बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील कोटलदिघी भागात भाजपच्या सहदेव नावाच्या ४५ वर्षीय कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी सहदेव याची हत्या केली, असा आरोप भाजपच्या प्रदेश समितीने केला. या घटनेची पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू’ अशी नोंद केली आहे. सहदेवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बिष्णुपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असे एका वृत्तात म्हटले आहे.
पश्चिम बंगाल में पेड़ से लटकता मिला एक और बीजेपी कार्यकर्ता का शव, भाजपा ने लगाया TMC के गुंडों पर हत्या का आरोप#WestBengal https://t.co/JT4dneOHLN
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 28, 2022
मृत सहदेव भाजपचचे सक्रीय कार्यकर्ते होते. ते आईस्क्रीम विकण्याचा व्यवसाय करत होते. तेे कोतुलपूर विधानसभा मतदारसंघातील गोपालपूर ढाक पारा येथे कार्यरत होते, असे भाजपने सांगितले. घरी परतत असतांना सहदेव यांची हत्या करण्यात आली आणि ती आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. या घटनेच्या विरोधात आमदार निलाद्री शेखर दाना यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली.
बिष्णुपूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या शुक्ला चॅटर्जी यांनी सहदेव यांच्या स्मरणार्थ मूक मोर्चा काढला. या प्रकरणाविषयी माहिती देतांना पोलीस अधीक्षक वैभव तिवारी यांनी हत्या झाल्याचा आरोप निराधार असल्याचे सांगितले. याआधी पूर्व मेदिनीपूरच्या खेजुरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा २२ वर्षीय मुलगा देबाशिष झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
संपादकीय भूमिका
|
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi