सीमेवर भारत आणि पाक यांच्या सैन्याधिकार्‍यांची बैठक पार पडली

नवी देहली – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर २९ जून या दिवशी भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’चे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

सीमा सुरक्षा दलाचे प्रवक्ते म्हणाले की, अशा प्रकारच्या बैठका या स्थानिक समस्यांच्या निवारणार्थ सातत्याने होणे आवश्यक असते.