मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे होण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी अद्याप पुष्कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे.

पालखी सोहळ्याचे ‘ड्रोन कॅमेऱ्या’च्या साहाय्याने चित्रीकरण करण्यास प्रतिबंध !

हे प्रतिबंध खासगी दूरचित्रवाहिन्या, खासगी व्यक्ती आणि संस्था आदींसाठी असून २७ जूनच्या रात्री १२ ते ४ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहेत. नीरा नदीतील स्नानानंतर पालखी २८ जून या दिवशी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे.

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथील ‘चिन्मय मूर्ती संस्थान’च्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश !

‘चिन्मय मूर्ती संस्थान’चे मठाधिपती पूजनीय माधवानंद महाराज यांच्या आज्ञेनुसार संस्थाननी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.

अशीही आणीबाणी !

…तर भारतातही आणीबाणी ! भारतीय संस्कृती ही संयमाची आहे. हा संयम मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. ती आता समाजाला शिकवून आणि करवून घ्यावी लागणार आहे. असे केले नाही, तर भविष्यात पाकप्रमाणे भारतातही बलात्कार रोखण्यासाठी आणीबाणी लागू करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये !

चिखली (बुलढाणा) येथे टाळ-मृदंगाच्या तालावर निघाली विवाहाची वरात !

बँड किंवा डीजे यांच्याऐवजी टाळ-मृदंगाच्या तालावर वरात काढणारे आदर्श वधू-वर !

वाई (जिल्हा सातारा) येथे भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण ! – शिवसेनेची तक्रार

निवेदनामध्ये म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार हा नगरपालिका आणि शासनाच्या निधीचा चुकीचा उपयोग करत आहे. या कामाचे देयक संबंधित ठेकेदारास देण्यात येऊ नये; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे शिवसैनिक आणि आमदार राजेंद्र पाटील यांच्या गटात झटापट !

जयसिंगपूर येथे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले अपक्ष आमदार आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी २७ जून या दिवशी निदर्शने केली.

पाटबंधारे विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून बंडगार्डन (पुणे) येथे नदीपात्रात काम चालू !

‘नदीपात्रात चालू असलेल्या कामामुळे पूर आल्यास त्यास उत्तरदायी कोण ?’, असा प्रश्न नदीप्रेमींनी विचारला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या रोखण्यासाठी शहरातील विविध नदीप्रेमी संस्था आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अल्पसंख्यांकांची मौज !

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ताधारक अल्पसंख्य विद्यार्थ्यांकरता वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारने १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील ३ वर्षांच्या एकत्रित निधीच्या तुलनेत हा निधी ५ पट आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

पू. तनुजा ठाकूर आमच्या घरून गेल्यावर एकदा रात्री मी त्या खोलीत झोपायला गेले होते. तेव्हा मला रात्रभर निराशा वाटत होती. मनात भविष्याविषयी उलटे-सुलट विचार येत होते. यावरून माझ्या लक्षात आले, ‘पू. दीदींनी जे सांगितले होते, ते किती सत्य होते !’